गुरुवार, १ एप्रिल, २०१०
शनिवार, २२ नोव्हेंबर, २००८
बराहा वापरा आणि मराठीत लिहा
आज मी बराहा हे सॉफ्ट्वेयर वापरून मराठीत कसे लिहायचे ते दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला आधी बराहाच्या साईट वर जावे लागेल. http://www.baraha.com या साईट वर गेल्यावर आपल्याला असे काही दिसेल.
या पानावर Download Baraha हा दुवा बघताय ना? तिथे टिचकी लावा आणि त्यामुळे तुमचे ब्राऊझर तुम्हाला ही फाईल सेव करू का असे विचारेल.
हा असा डायलाग बॉक्स दिसेल तेव्हा Save ही बटन दाबा, पण आधी ही फाईल कुठे सेव होतेय ते पाहायला विसरू नका. माझ्या कंप्यूटर वर बघा ती डेस्कटॉप वर ठेवली जाणार आहे. तिचे नाव baraha70.exe असे असणार आहे हे पण लक्षात घ्या.
तुमच्या डेस्कटॉप वर असा त्या फाईल चा आयकन दिसेल. आता आपल्याजवळ बराहा हे सॉफ्टवेयर फाईल स्वरूपात आले. त्यावर दोनदा जलद टिचक्या मारल्या की ते सॉफ्टवेयर आपल्या कम्प्यूटर मधे स्थापित होईल. मग चला आपण त्यावर द्वीटीचकी लावूया.
विंडोज एक्सपी तुम्हाला असा डॉयलाग बाक्स दाखवून विचारेल की ही फाईल विश्वासपात्र स्रोताकडून असेल तरच स्थापित करा. आपण ही बराहा च्या साईट वरून आणलेली आहे आणि आपल्याला या फाईल बद्दल अचूक माहित असल्याने आपण या डॉयलाग बाक्स ची Run ही बटन दाबायची आहे.
आता बराहा सॉफ्ट्वेयर स्थापित व्हायला सुरवात होईल. खरे म्हणजे आता फार काही न विचार करता आपल्याला Next ही बटन दाबत जायचे आहे. चला तर मग आपण नेक्स्ट ची बटन दाबूया.
बराहा वापरायचा परवाना आपल्याला काही नियम पाळल्याने मिळतोय असे या बॉक्स मधे सांगण्यात येईल इथेही Next ची बटन दाबा.
कुठे स्थापित करायचे विचरणा होईल आणि एक जागा आधिच सुनिश्चित असेल इथेही Next दाबा.
Baraha 7.0 असे तुमच्या स्टार्ट मेनू मधे बराहा चे नाव दिसेल असे सांगण्यात येईल. इथेही Next दाबा.
बराहा स्थापित झाल्यावर तुमच्या डेस्कटॉप वर बराहा चा आयकन ठेवायचा का असा चे्कबाक्स असेल तो तसाच राहू द्या म्हणजे तुम्हाला तो आयकन तुमच्या डेक्सटॉप वर दिसेल आणि तिथूनच वापरता येईल. इथेही Next ची बटन दाबा.
आता सगले प्रश्न विचारून झाले आणि बराहा स्थापित व्हायला सज्ज आहे अशी सुचना देण्यात येईल आणि या इथे Install असे बटन असेल ते दाबा म्हणजे बराहा स्थापित व्हायला सुरवात होईल.
असे प्रगती दर्शक चित्र पहायला मिळेल.
सगळे झाल्यावर बराहा चा इंस्टालर तुम्हाला सांगेल की सगळे व्यवस्थित पार पडले आहे. या इथे Finish ही बटन दाबा. म्हणजे आता तुमच्या कंप्यूटर वर बराहा स्थापित झाले.
तुमच्या डेस्कटॉप वर तुम्हाला असे तीन आयकन दिसतील. त्यातला Baraha Direct 7.0 हा आयकन आपण आज कसा वापरायचा ते बघूया. पण त्या आधी तुमच्या कम्प्यूटर वरचे एक महत्वाचे सेटींग पाहणे अत्यावश्यक आहे.
स्टार्ट मेनू मधून कंट्रोल पॅनल ची खिडकी उघडा, म्हणजे कंट्रोल पॅनल वर टिचकी लावा.
कंट्रोल पॅनल मधे Regional Language Options असा आयकन दिसेल त्यावर द्वीटीचकी लावा.
Regional Language Options च्या डायलाग बाक्स मधे Languages असा Tab दुस~या क्रमांकावर आहे त्यावर टीचकी लावा. त्या टॅब बर Install files for Complex Script and right-to-left languages (including Thai) असा एक चेकबाक्स आहे तिथे बरोबर चिन्ह असणे आवश्यक आहे. ते नसेल तर आता लावा आणि हे लावताना तुम्हाला विण्डोज एक्सपी ची सीडी टाकण्याची विचारणा होईल म्हणून तु्मची विंडोज XP ची सीडी जवळ असुद्या. इथे आधिच बरोबर चिन्ह असेल तर छान च आहे.
आता डेस्कटॉप वरच्या Baraha Direct 7.0 या आयकन वर व्दीटीचकी लावा म्हणजे बराहा डायरेक्ट सुरू होईल. तो सुरू झाला हे कसे समजायचे? तर तुमच्या सि्स्टीम ट्रे मधे बराहा चा पिवळा आयकन दिसेल बघा उजवी कडे खाली.
इथे सध्या KN म्हणजे कन्नडा भाषा निवडलेली आहे. आपल्याला तर मराठीत लिहायचे आहे. म्हणून या आयकन वर उजवी टीचकी लावा व मेनू मधून Language > Marathi > Unicode से चित्रात दाखवल्याप्रमाणे निवडा.
आता आपण मराठीत लिहायला सज्ज झालो.
हा बराहा चा पिवळा आयकन आपल्याला सध्या कोणती भाषा सुरू आहे ते सांगत राहतो आणि F11 हे कीबोर्ड वरचे बटन दाबून आपल्याला भाषा कधीही बदलता येते.
आता आपण नोटपॅड, जीटॉक, जीमेल, ऑरकूट असे कुठेही मराठीत लिहू शकतो. गरज नसताना आपण या आयकन वर उजवी टीचकी लावून Exit म्हटले की बराहा बंद करता येते.
तुषार जोशी, नागपूर
सोमवार, २० ऑक्टोबर, २००८
मराठीत कसे लिहायचे
खरे म्हणजे मराठीत लिहिण्याचे अनेक प्रकार आताशा उपलब्ध आहेत. आज मी तुम्हाला एकही सॉफ्ट्वेयर न डाऊनलोड करता मराठीत कसे लिहायचे ते सांगणार आहे.
ओंकार जोशी यांनी तयार केलेली गमभन ही एक सुरेख पद्धती आहे. http://var-x.com/gamabhana/ गमभन च्या साईट वर आपण मराठीत लिहू शकतो आणि आपण लिहिलेले आपण आपल्या संगणकावर जतन पण करू शकतो. जतन करण्याची बटन पण या पानावर आहे. इथे लिहिलेले आपण नोटपॅड वरही पेस्ट करू शकतो.
ही साईट फक्त ईंटरनेट एक्स्प्लोरर आणि फारयफॉक्स मधेच चालते असे लक्षात आले आहे.
नवीन माहीती:
गमभन या प्रणालीसाठी आता http://www.gamabhana.com ही वेब साईट उपलब्ध झाली आहे. यामुळे आता आपल्याला हे नाव लक्षात ठेवले की सहज त्या साईट वर जाता येणार आहे.
तुषार जोशी, नागपूर
शनिवार, १८ ऑक्टोबर, २००८
मराठी कविता ध्वनीमुद्रीत कशी करायची?
तुम्ही कविता करता आणि तुम्हाला तुमची कविता ध्वनीमुद्रीत करायची आहे, किंवा तुम्हाला तुमची आवडती कोणाची ही कविता ध्वनीमुद्रित करायची आहे. असे असेल तर आपण आज इथे हे कसे करायचे याची चर्चा करणार आहोत.
किमान साधने
कविता रेकार्ड करायला आपल्याला एक सॉफ्ट्वेयर वापरायचे आहे त्याचे नाव आहे ऑडासिटी. ऑडासिटी हे विनामुल्य डाऊनलोड करता येते. सर्वप्रथम आपण हे कसे डाऊनलोड करायचे आणि स्थापित करायचे ते पाहूया.
ही ऑडासिटी ची वेब साईट आहे. इथून नुतन प्रत डाऊनलोड करा. सध्या च्या प्रतीचा क्रमांक आहे १.२ आणि विंडॊज साठी लागणारी प्रत आहे इथे. ही आपल्या कम्प्युटर वर जतन करा. हिला दोनदा टीचक्या मारून स्थापित करा.
एकदा का ऑडासिटी स्थापित झाले की ते स्टार्ट मेनू मधे दिसेल तिथून सुरू करा आणि तुम्हाला रेकार्ड प्लेयर सारख्याच बटना दिसतील. प्ले, रेकार्ड, अश्या. त्या वापरून पहा झकास ध्वनिमुद्रण करता येते.
तुषार जोशी, नागपूर
लेबल:
ध्वनिमुद्रण,
मराठी,
audacity,
marathi,
podcasting,
recording
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)