तुम्ही कविता करता आणि तुम्हाला तुमची कविता ध्वनीमुद्रीत करायची आहे, किंवा तुम्हाला तुमची आवडती कोणाची ही कविता ध्वनीमुद्रित करायची आहे. असे असेल तर आपण आज इथे हे कसे करायचे याची चर्चा करणार आहोत.
किमान साधने
कविता रेकार्ड करायला आपल्याला एक सॉफ्ट्वेयर वापरायचे आहे त्याचे नाव आहे ऑडासिटी. ऑडासिटी हे विनामुल्य डाऊनलोड करता येते. सर्वप्रथम आपण हे कसे डाऊनलोड करायचे आणि स्थापित करायचे ते पाहूया.
ही ऑडासिटी ची वेब साईट आहे. इथून नुतन प्रत डाऊनलोड करा. सध्या च्या प्रतीचा क्रमांक आहे १.२ आणि विंडॊज साठी लागणारी प्रत आहे इथे. ही आपल्या कम्प्युटर वर जतन करा. हिला दोनदा टीचक्या मारून स्थापित करा.

एकदा का ऑडासिटी स्थापित झाले की ते स्टार्ट मेनू मधे दिसेल तिथून सुरू करा आणि तुम्हाला रेकार्ड प्लेयर सारख्याच बटना दिसतील. प्ले, रेकार्ड, अश्या. त्या वापरून पहा झकास ध्वनिमुद्रण करता येते.
तुषार जोशी, नागपूर
कविता ध्वनीमुद्रीत करायचं दूर आहे... आधी मुळात तुमच्यासारख्या सुरेख कविता लिवायच्या कशा ते सांगितलंत तर लई बेस व्हयील बगा राव!
उत्तर द्याहटवा