शनिवार, २२ नोव्हेंबर, २००८

बराहा वापरा आणि मराठीत लिहा

आज मी बराहा हे सॉफ्ट्वेयर वापरून मराठीत कसे लिहायचे ते दाखवणार आहे.  त्यासाठी आपल्याला आधी बराहाच्या साईट वर जावे लागेल. http://www.baraha.com या साईट वर गेल्यावर आपल्याला असे काही दिसेल.

इथे Download Baraha हा दुवा दिसेल त्यावर टिचकी लावा आणि बराहा चा डाऊनलोड चा पेज दिसेल


या पानावर Download Baraha हा दुवा बघताय ना?  तिथे टिचकी लावा आणि त्यामुळे तुमचे ब्राऊझर तुम्हाला ही फाईल सेव करू का असे विचारेल.  


हा असा डायलाग बॉक्स दिसेल तेव्हा Save ही बटन दाबा, पण आधी ही फाईल कुठे सेव होतेय ते पाहायला विसरू नका.  माझ्या कंप्यूटर वर बघा ती डेस्कटॉप वर ठेवली जाणार आहे.  तिचे नाव baraha70.exe असे असणार आहे हे पण लक्षात घ्या.


तुमच्या डेस्कटॉप वर असा त्या फाईल चा आयकन दिसेल.  आता आपल्याजवळ बराहा हे सॉफ्टवेयर फाईल स्वरूपात आले.  त्यावर दोनदा जलद टिचक्या मारल्या की ते सॉफ्टवेयर आपल्या कम्प्यूटर मधे स्थापित होईल.  मग चला आपण त्यावर द्वीटीचकी लावूया.



विंडोज एक्सपी तुम्हाला असा डॉयलाग बाक्स दाखवून विचारेल की ही फाईल विश्वासपात्र स्रोताकडून असेल तरच स्थापित करा.  आपण ही बराहा च्या साईट वरून आणलेली आहे आणि आपल्याला या फाईल बद्दल अचूक माहित असल्याने आपण या डॉयलाग बाक्स ची Run  ही बटन दाबायची आहे.



आता बराहा सॉफ्ट्वेयर स्थापित व्हायला सुरवात होईल.  खरे म्हणजे आता फार काही न विचार करता आपल्याला Next ही बटन दाबत जायचे आहे.   चला तर मग आपण नेक्स्ट ची बटन दाबूया.



बराहा वापरायचा परवाना आपल्याला काही नियम पाळल्याने मिळतोय असे या बॉक्स मधे सांगण्यात येईल इथेही Next ची बटन दाबा.



कुठे स्थापित करायचे विचरणा होईल आणि एक जागा आधिच सुनिश्चित असेल इथेही Next दाबा.



Baraha 7.0 असे तुमच्या स्टार्ट मेनू मधे बराहा चे नाव दिसेल असे सांगण्यात येईल.  इथेही Next दाबा.



बराहा स्थापित झाल्यावर तुमच्या डेस्कटॉप वर बराहा चा आयकन ठेवायचा का असा चे्कबाक्स असेल तो तसाच राहू द्या म्हणजे तुम्हाला तो आयकन तुमच्या डेक्सटॉप वर दिसेल आणि तिथूनच वापरता येईल.  इथेही Next ची बटन दाबा.



आता सगले प्रश्न विचारून झाले आणि बराहा स्थापित व्हायला सज्ज आहे अशी सुचना देण्यात येईल आणि या इथे Install  असे बटन असेल ते दाबा म्हणजे बराहा स्थापित व्हायला सुरवात होईल.



असे प्रगती दर्शक चित्र पहायला मिळेल.


सगळे झाल्यावर बराहा चा इंस्टालर तुम्हाला सांगेल की सगळे व्यवस्थित पार पडले आहे.  या इथे Finish ही बटन दाबा.  म्हणजे आता तुमच्या कंप्यूटर वर बराहा स्थापित झाले.


तुमच्या डेस्कटॉप वर तुम्हाला असे तीन आयकन दिसतील.  त्यातला Baraha Direct 7.0  हा आयकन आपण आज कसा वापरायचा ते बघूया.  पण त्या आधी तुमच्या कम्प्यूटर वरचे एक महत्वाचे सेटींग पाहणे अत्यावश्यक आहे.




स्टार्ट मेनू मधून कंट्रोल पॅनल ची खिडकी उघडा, म्हणजे कंट्रोल पॅनल वर टिचकी लावा.



कंट्रोल पॅनल मधे Regional Language Options असा आयकन दिसेल त्यावर द्वीटीचकी लावा.


Regional Language Options च्या डायलाग बाक्स मधे Languages असा Tab दुस~या क्रमांकावर आहे त्यावर टीचकी लावा.   त्या टॅब बर Install files for Complex Script and right-to-left languages (including Thai) असा एक चेकबाक्स आहे तिथे बरोबर चिन्ह असणे आवश्यक आहे.  ते नसेल तर आता लावा आणि हे लावताना तुम्हाला विण्डोज एक्सपी ची सीडी टाकण्याची विचारणा होईल म्हणून तु्मची विंडोज XP ची सीडी जवळ असुद्या.  इथे आधिच बरोबर चिन्ह असेल तर छान च आहे.

आता डेस्कटॉप वरच्या Baraha Direct 7.0 या आयकन वर व्दीटीचकी लावा म्हणजे बराहा डायरेक्ट सुरू होईल. तो सुरू झाला हे कसे समजायचे? तर तुमच्या सि्स्टीम ट्रे मधे बराहा चा पिवळा आयकन दिसेल बघा उजवी कडे खाली.


इथे सध्या KN म्हणजे कन्नडा भाषा निवडलेली आहे.  आपल्याला तर मराठीत लिहायचे आहे.  म्हणून या आयकन वर उजवी टीचकी लावा व मेनू मधून Language > Marathi > Unicode से चित्रात दाखवल्याप्रमाणे निवडा.

आता आपण मराठीत लिहायला सज्ज झालो.


हा बराहा चा पिवळा आयकन आपल्याला सध्या कोणती भाषा सुरू आहे ते सांगत राहतो आणि F11 हे कीबोर्ड वरचे बटन दाबून आपल्याला भाषा कधीही बदलता येते.

आता आपण नोटपॅड, जीटॉक, जीमेल, ऑरकूट असे कुठेही मराठीत लिहू शकतो.  गरज नसताना आपण या  आयकन वर उजवी टीचकी लावून Exit म्हटले की बराहा बंद करता येते.

तुषार जोशी, नागपूर