सोमवार, २० ऑक्टोबर, २००८

मराठीत कसे लिहायचे

खरे म्हणजे मराठीत लिहिण्याचे अनेक प्रकार आताशा उपलब्ध आहेत.  आज मी तुम्हाला एकही सॉफ्ट्वेयर न डाऊनलोड करता मराठीत कसे लिहायचे ते सांगणार आहे.


ओंकार जोशी यांनी तयार केलेली गमभन ही एक सुरेख पद्धती आहे.  http://var-x.com/gamabhana/ गमभन च्या साईट वर आपण मराठीत लिहू शकतो आणि आपण लिहिलेले आपण आपल्या संगणकावर जतन पण करू शकतो.  जतन करण्याची बटन पण या पानावर आहे.  इथे लिहिलेले आपण नोटपॅड वरही पेस्ट करू शकतो.

ही साईट फक्त ईंटरनेट एक्स्प्लोरर आणि फारयफॉक्स मधेच चालते असे लक्षात आले आहे.

नवीन माहीती:
गमभन या प्रणालीसाठी आता http://www.gamabhana.com ही वेब साईट उपलब्ध झाली आहे.  यामुळे आता आपल्याला हे नाव लक्षात ठेवले की सहज त्या साईट वर जाता येणार आहे.

तुषार जोशी, नागपूर

शनिवार, १८ ऑक्टोबर, २००८

मराठी कविता ध्वनीमुद्रीत कशी करायची?

तुम्ही कविता करता आणि तुम्हाला तुमची कविता ध्वनीमुद्रीत करायची आहे, किंवा तुम्हाला तुमची आवडती कोणाची ही कविता ध्वनीमुद्रित करायची आहे.  असे असेल तर आपण आज इथे हे कसे करायचे याची चर्चा करणार आहोत.

किमान साधने
कविता रेकार्ड करायला आपल्याला एक सॉफ्ट्वेयर वापरायचे आहे त्याचे नाव आहे ऑडासिटी.  ऑडासिटी हे विनामुल्य डाऊनलोड करता येते.  सर्वप्रथम आपण हे कसे डाऊनलोड करायचे आणि स्थापित करायचे ते पाहूया.

ही ऑडासिटी ची वेब साईट आहे.  इथून नुतन प्रत डाऊनलोड करा.  सध्या च्या प्रतीचा क्रमांक आहे १.२ आणि विंडॊज साठी लागणारी प्रत आहे इथे.  ही आपल्या कम्प्युटर वर जतन करा.  हिला दोनदा टीचक्या मारून स्थापित करा.
एकदा का ऑडासिटी स्थापित झाले की ते स्टार्ट मेनू मधे दिसेल तिथून सुरू करा आणि तुम्हाला रेकार्ड प्लेयर सारख्याच बटना दिसतील.  प्ले, रेकार्ड, अश्या.  त्या वापरून पहा झकास ध्वनिमुद्रण करता येते.

तुषार जोशी, नागपूर