सोमवार, २० ऑक्टोबर, २००८

मराठीत कसे लिहायचे

खरे म्हणजे मराठीत लिहिण्याचे अनेक प्रकार आताशा उपलब्ध आहेत.  आज मी तुम्हाला एकही सॉफ्ट्वेयर न डाऊनलोड करता मराठीत कसे लिहायचे ते सांगणार आहे.


ओंकार जोशी यांनी तयार केलेली गमभन ही एक सुरेख पद्धती आहे.  http://var-x.com/gamabhana/ गमभन च्या साईट वर आपण मराठीत लिहू शकतो आणि आपण लिहिलेले आपण आपल्या संगणकावर जतन पण करू शकतो.  जतन करण्याची बटन पण या पानावर आहे.  इथे लिहिलेले आपण नोटपॅड वरही पेस्ट करू शकतो.

ही साईट फक्त ईंटरनेट एक्स्प्लोरर आणि फारयफॉक्स मधेच चालते असे लक्षात आले आहे.

नवीन माहीती:
गमभन या प्रणालीसाठी आता http://www.gamabhana.com ही वेब साईट उपलब्ध झाली आहे.  यामुळे आता आपल्याला हे नाव लक्षात ठेवले की सहज त्या साईट वर जाता येणार आहे.

तुषार जोशी, नागपूर

२ टिप्पण्या:

  1. प्रिय तुषार,
    आधी नुसते technical blogs, मग नुसते मराठी blogs... आणि आता चक्क मराठी technical blog!! सुचते कसे काय बुवा!
    अमेरिकेत मराठी जतन करायचा एक प्रयत्न आहे का? :-)

    उत्तर द्याहटवा
  2. माहितीबद्दल आभारी ! फक्त मला बरहाचे नव्हे व्हर्जन लै किचकट वाटते राव !!!

    उत्तर द्याहटवा

या लेखाबद्दल तुम्हाला काय वाटले? यात तुम्हाला आणि काय काय वाचायला आवडेल हे नक्की लिहा.